
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी ’द रेझिस्टेन्स फोर्स’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ही संघटना लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित असून थेट काश्मिरातील दहशतवादाशी या स्फोटाचा संबंध जोडला गेला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारच्या मालकाला अटक केली असून हरयाणातील एका महिला डॉक्टरला जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथून ताब्यात घेतले आहे. एनआयएने स्फोटात ठार झालेला दहशतवादी डॉ. उमर याचा साथीदार आमीर रशीद अली याच्या दिल्लीतून मुसक्या आवळल्या.




























































