
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांना आदरांजली वाहण्यासाठी जोशी कुटुंबियांच्या वतीने उद्या प्रार्थना सभा आयोजित केली आहे. आज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत वॉव्हज बँक्वेट, सिद्धिविनायक मंदिरासमोर, प्रभादेवी येथे ही प्रार्थना सभा होणार आहे, अशी माहिती जोशी कुटुंबियांच्यावतीने देण्यात आली आहे.
विधिमंडळात श्रद्धांजली
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री, मनोहर जोशी तसेच विधानसभा सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नार्वेकर यांच्याकडून या दिवंगत सदस्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. त्यानंतर यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. तर विधान परिषदेतही या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली.





























































