
लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते दिवंगत मनोहर जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मनोहर जोशी यांच्या जन्मदिनी त्यांच्या प्रतिमेस सेनापती बापट मार्गावरील कोहिनूर येथील कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. जागतिक मराठी चेंबरचे माजी संचालक सुरेश महाजन, माजी संचालक प्रकाश चिखलीकर, माजी सरचिटणीस प्रवीण शेटये, कोषाध्यक्ष मनोहर साळवी, पटवर्धन आदी पदाधिकारी, शिवसैनिक आणि सरांची चाहते मंडळी यावेळी अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



























































