
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी’ची 6 डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी स्पष्ट सांगितलं की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना बंगालच्या उत्तरेकडील भागात आधीच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी होणार्या इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांना आधी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे याकाळात त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.
‘मला इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल माहिती नाही. मला बैठकीबद्दल कोणीही सांगितलं नाही किंवा फोन आला नाही. माहिती नाही. उत्तर बंगालमध्ये 6 ते 7 डिसेंबरपर्यंत माझे निश्चित कार्यक्रम आहेत. मी आधीच इतर कार्यक्रम आखले आहेत. आता त्यांनी फोन केला तर मी त्या आयोजनात कशी बदल करू शकणार? या बैठकीबद्दल आधीच माहिती मिळाली असतील तर मी गेले असते’, असं बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितलं.
त्यामुळे आपल्या राज्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्यानं ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.




























































