रायगडमध्ये पहिल्यांदाच तिहेरी तलाक, प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नी व दोन मुलांना सोडले

केंद्र सरकारने तिहेरी तलाकवर बंदी घातली असली तरी आजही देशाच्या कानाकोपऱ्यात तिहेरी तलाक देण्याचे प्रकार सुरूच आहेत. रायगडमधील म्हसळा शहरात राहणाऱ्या एका युवकाने दुसरे विवाह करण्यासाठी आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना म्हसळा शहरात घडली आहे. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कायदा अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

म्हसळा शहरातील साजीद शगीर इनामदार या तरुणाने 25 ऑक्टोंबर 2013 रोजी शरीफा मोहम्मद हनिफ शेख (26) या तरुणीशी लग्न केले होते. साजीद इनामदार याचा दुबई येथे व्यवसाय असुन तो म्हसळ्यामध्ये ये जा करत असे. साजीदचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्या तरुणी सोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने 31 ऑक्टोंबर 2019 रोजी आपल्या पत्नीला तोंडी तलाक दिला. तसेच साजीद इनामदार ( वय 5 वर्षे ) व मुसा साजीद इनामदार (वय 4 वर्षे ) या चिमुकल्या मुलांना व पत्नीला सोडून निघून गेला. याप्रकरणी शरीफाने म्हसळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी साजीद शगीर इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या