
उत्तराखंडची राजधानी देहराधूनमध्ये त्रिपुराच्या एका विद्यार्थ्याचा चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 9 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान देहरादूनच्या सेलाकुई परिसरात घडली आहे. एंजेल चकमा असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
जिग्यासा विद्यापीठात एमबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत इसलेला एंजेल चकमा हा त्याचा धाकटा भाऊ मायकेल याच्यासोबत खरेदीसाठी बाहेर पडला होता. तिथे काही तरुणांनी त्यांच्या दिसण्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या करायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी ‘नेपाळी’, ‘चायनीज’, ‘चिनी’ आणि ‘मोमो’ सारखे वर्णद्वेषी अपशब्द वापर केल्याचा आरोप आहे.
एंजेलच्या भावाने मायकल चकमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. वर्णद्वेषी अपशब्दांना विरोध केल्याने त्यांनी दोन्ही भावांना मारहाण केली. मायकलच्या डोक्यावर कड्याने वार केला. ज्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी एंजलवर चाकूने हल्ला केला. शिवाय हल्लेखोरांनी दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकी दिली.
गंभीर जखमी झालेल्या एंजेलला तत्काळ रुग्णालयात दाखल केली. त्याला तिथे आयसीयूत दाखल केले. डॉक्टरांनी 17 दिवस त्याच्यावर उपचार केले. मात्र, सतरा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. सेलाकुई पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक विद्यार्थी मणिपूरचा रहिवासी आहे. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.



























































