टीआरपी घोटाळा – एका चॅनल्सच्या बँक खात्यात आले 70-80 कोटी

टीआरपी घोटाळ्याच्या तपासा दरम्यान पाच चॅनल्स पैकी एका चॅनल्स च्या बँक खात्यात तीन महिन्यात अचानक 70-80 कोटी रुपये आल्याची बाब समोर आली आहे. त्या पैशाचा नेमका स्रोत कोणता आहे, ते उत्पन्न जाहिरातीतुन आले आहे का, आल्यास त्याचा टीआरपीशी संबंध आहे का याचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. या प्रकरणात पोलीस आणखी चार भादंवि कलम वाढवणार आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळा उघड करून आता पर्यंत 8 जणांना अटक केली असून काहींचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी काहींच्या बँक खात्याबाबतचे तपशील मागवले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक हे कागदपत्रे तपासण्याच्या कामात मदत करत आहे. तपासा दरम्यान पाच चॅनल्स पैकी एका चॅनल्सच्या बँक खात्यात अचानक तीन महिन्यात 70-80 कोटी रुपये आल्याचे समोर आले आहे. ते पैसे नेमके कसे आले होते. त्याचा काही टीआरपी शी संबंध आहे का याचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करणार आहेत.

टीआरपी घोटाळ्यात पोलीस आता तपासाची व्याप्ती वाढवणार आहेत. पूर्वी जे चौकशीसाठी क्राईम ब्रँचमध्ये येत होते, पोलीस त्याना काय प्रश्न विचारतात याची माहिती बाहेर उघड होत होती. त्यामुळे या पुढे पोलीस आता जबाब हा प्रश्न उत्तरे स्वरूपात नोंदवणार आहेत. टीआरपी प्रकरणात पोलिसांनी नुकतीच चार भादंवि कलम वाढवली होती. आता आणखी चार भादंवि कलम 408, 465, 463, 468 वाढ केली जाणार आहे. पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ शिवा सुब्रमण्यम याचा जबाब नोंदवला आहे. शुक्रवारी पुन्हा त्याना जबाब नोंदवण्यासाठी बोलवले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या