
टीआरपी घोटाळय़ात याआधी रिपब्लिक टीव्हीचे सहाय्यक उपाध्यक्ष घनश्याम सिंह यांना पोलिसांनी अटक केली होती. सिंह यांची 5 सप्टेंबरला जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान, या घोटाळय़ाच्या तपासाविरोधात रिपब्लिक मीडिया नेटवर्पची मालकी असलेल्या एआरजी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण न्यायालयाने याचिकेची दखलही घेतली नाही.
टीआरपी प्रकरणात क्राइम ब्रँचने आज ‘रिपब्लिक टीव्ही’चे सीईओ विकास शंकरलाल खानचंदानी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. टीआरपी घोटाळय़ात रिपब्लिक टीव्हीशी संबोधित असलेली ही दुसरी अटक आहे.
विकास खानचंदानी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली असून अटकेतील आरोपींची संख्या 13 झाली आहे. खानचंदानी यांच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त केला आहे. आज दुपारी खानचंदानी यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खानचंदानी यानी वरिष्ठांशी व्हॉटस्अॅप चॅटिंग केलेला मोबाईल पोलिसांना दिलेला नाही. त्या मोबाईलमुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.




























































