टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणामध्ये निर्माण झालेल्या राजकीय संघर्षात टीआरएस नेता नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. रेड्डी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी विकराबाद जिह्यातील सुल्तानपूर या गावात मिळाला. रेड्डी यांच्या हत्येनंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी कॉग्रेसच्या दोन समर्थकांना मारहणा केली. या मारहाणीत हो दोन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी नारायण ग्रुप आणि त्यांच्या विरोधातील एका गटात वाद झाला. या वादानंतर प्रकरण आणखीनच पेटले. यात तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते रेड्डी यांच्या हत्या करण्यात आली.