बस आणि ट्रकमध्ये कार चेपली, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
truck-car-bus

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महामार्गावरील जतेगाव फाट्यावर गुरुवारी तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. बस, आणि ट्रकच्या मध्ये आय-20 कार आल्याने हा अपघात झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आज पहाटे 6.30 च्या सुमारास जतेगाव घाटात ट्रकने कारला मागून धडक दिली. त्यामुळे कार पुढे असलेल्या बसच्या मागच्या बाजूवर आदळली आणि चेपली गेली असे सांगण्यात येत आहे. आय-20 कारमधील 2 व्यक्ती प्रसाद रावसाहेब उंडे आणि भास्कर रंगनाथ डावखरे यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.