केंद्राने दखल न घेतल्यास ट्रक, कंटेनरची चाके बंद पडतील; मालवाहतूकदारांचा इशारा

2028
प्रातिनिधीक छायाचित्र

केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करताना मालवाहतूक क्षेत्राचा कोणताही विचार न केल्याने एक दिवस मालवाहतूकीची चाके पूर्णपणे थांबतील असा इशारा मालवाहतूकदारांच्या संघटनेने दिला आहे. कोरोना व्हायरस साथीमुळे सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी विभिन्न प्रकारच्या क्षेत्रासाठी पाच टप्प्यात आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली. परंतु ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाकडे केंद्र सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग्रेस(AIMTC) संघटनेचे कोअर कमिटी सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कीत सिंह यांनी केला आहे. जीवनावश्यक आणि अन्य वस्तूंची वाहतूक केवळ 15 ते 25 टक्के ट्रक, कंटेनर्स आणि अन्य वाहनांमधून कशीबशी होत आहे. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आर्थिक संकटातून जात आहे.

मालवाहतूकदारांच्या मागण्या

मोटर विम्याचे हप्ते भरण्यासाठी अंतिम तारीख 15 मे होती, त्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात यावी, अन्य आवश्यक कागदपत्रांचे नुतनीकरण आणि शुल्क भरण्यासाठीच्या अंतिम तारखेस किमान सहा महीने मुदतवाढ मिळावी, संपूर्ण देशातील रोड टैक्स और ट्रान्सपोर्ट सेक्टर संबंधित अन्य टैक्समधून‌ सुट मिळावी, कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, ईएमआय (मासिक हप्ता) सहा महीन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावे आदी मागण्या मालवाहतूकदारांनी केल्या आहेत.

मजूरांच्या वाहतूकीसाठी गैरवापर

95 लाख ट्रान्सपोर्ट ऑपरेटर आर्थिक संकटात आहेत. त्यांच्याकडे आपल्या स्टाफला पगार देण्यासाठी पैसे नाहीत. कर्जाचे हप्ते, मोटर इंश्योरेंसचे हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत. जर विमा, टैक्स आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव वाढला तर सिंगल आणि छोटे ट्रान्सपोर्ट व्यवसायी मजबुरीमुळे आपली वाहने चालविणे बंद करतील असा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेसचे (AIMTC) बाल मल्कीत सिंह यांनी दिला आहे. पोलीस जबरदस्तीने मजदूरांना आमच्या बांधवांच्या ट्रकमध्ये बसवून त्यांच्या राज्यांच्या सीमेवर पाठवून देत आहे. आणि आरटीओ या गाड्यांना जप्त करून ‘एफआयआर’ करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या