
ट्रू कॉलरने युजर्सच्या सोयीसाठी काही नवीन फीचर आणले आहेत. त्यामुळे आता ट्रू कॉलरवर कॉल रेकॉर्डिंग करता येईल. ट्रू कॉलरवर आता सर्व इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉल रेकॉर्ड करू शकता येतील.
ही सुविधा सुरुवातीला केवळ प्रीमियम फीचर म्हणून होती. मात्र आता ते विनामूल्य जारी करण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉलर आयडीसह नवे इंटरफेस, घोस्ट कॉल आणि कॉल घोषणा यांसारखे नवे फिचर्स ट्रू कॉलरवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.





























































