
ग्रीनलँड ताब्यात घेण्यास अमेरिकेचा विरोध करणाऱ्या 8 युरोपियन देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 टक्के टॅरिफ लावले आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांवर अमेरिकेने टॅरिफ लादले आहे. 1 फेब्रुवारीपासून ते लागू होणार आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिली. ग्रीनलँडबाबत अमेरिकेसोबत कोणताही करार न झाल्यास 1 जूनपासून टॅरिफ 25 टक्के होईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.



































































