आशा आहे सर्व लवकरच थांबेल -ट्रम्प

हिंदुस्थानच्या सिंदूर ऑपरेशनबद्दल ऐकले. आशा आहे हे सर्व लवकरच थांबेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये असताना याबाबत समजले. हे सर्व लज्जास्पद आहे. ते खूप मोठया काळापासून लढत आहेत. कित्येक दशके, शतके लढत आहेत, असेही ते म्हणाले. तुम्हाला जगासाठी काही संदेश द्यायचा आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता आशा आहे हे सर्व लवकरच थांबेल असे ट्रम्प म्हणाले.