
थायलंड आणि कंबोडियामध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी तोंडघशी पडले. ट्रम्प यांच्या या दाव्याला 24 तास उलटत नाहीत तोच थायलंड आणि कंबोडियाचे सैनिक पुन्हा भिडले व एकमेकांवर तोफा, गोळ्यांचा वर्षाव केला. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ‘थायलंड आणि कंबोडियाच्या पंतप्रधानांचे बोलणे करून दिले आहे. दोन्ही देश तत्काळ शस्त्रसंधी व शांतता चर्चेला तयार आहेत,’ असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र काही तासांतच सीमेवर पुन्हा धुमश्चक्री उडाली.