
>> तृप्ती कुलकर्णी
कवयित्री शांता शेळके यांच्या ‘एकाकी’ कवितेच्या या पुढील ओळी म्हणजे स्त्राrच्या स्वप्नभंगाचा, तिच्या नात्यांचा होरपळवणारा विलापच जणू. जो डॉ. वर्षा फाटक यांच्या ‘पाश’ या कथासंग्रहाचं सार सांगू पाहतो. तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे…
बिलगणारी बोटे तीही बिलगूनसुद्धा दूर, खोल खोल भुयारात कण्हणारे सूर…
दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय, त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय?
पुष्पपाल सिंग संपादित ‘नोकरीपेशा नारी कहानी के आईने में’ या हिंदी कथासंग्रहाचा हा मराठी अनुवाद स्त्राr जीवनातील वेदना, संघर्ष आणि आत्मतेजाचं जिवंत प्रतिबिंब आहे. या कथांचा भाषिक आणि भावनिक आविष्कार इतका स्वाभाविक, इतका मराठी वाटतो की, अनुवादाची जाणीवच राहत नाही. हेच डॉ. वर्षा फाटक यांच्या भाषिक संवेदनशीलतेचं यश म्हणावं लागेल.
कालौघात जगण्याच्या पद्धतीत बदल झाला तरी पण समाजाच्या मनोभूमिकेतील पुरुषप्रधानता अजूनही तशीच घट्ट आहे. एकीकडे स्त्राrला देवत्व देऊन पूजन, तर दुसरीकडे घराच्या चार भिंतींआड तिला हीनतेने वागवणं ही विसंगती आजही समाजाचं विषण्ण वास्तव आहे. त्यामुळे स्त्राrमुक्ती चळवळीच्या दशकांनंतर लिहिलेल्या या कथा आजही तितक्याच ताज्या आणि वास्तव वाटतात.
या अठरा कथांमधून स्त्राrची असंख्य रूपं उमटतात- आई, पत्नी, नोकरदार स्त्राr, कन्या. प्रत्येक रूपात तिची वेदना, तडफड आणि जगण्याची झुंज आहे. तरीही तिच्या आत कुठेतरी झळकणारं आत्मतेज, स्वत्वाची जाणीव आणि आत्मविश्वासही दिसतो. चूल-मूल केंद्रित जीवनातून बाहेर पडलेली स्त्राr अजूनही पाशातून पूर्ण मोकळी झालेली नाही. तिला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा आहे, पण उत्तरं देण्याच्या, निर्णय घेण्याच्या तिच्या वाटा अजूनही काटेरी आहेत. घर आणि बाह्यजगाच्या दुहेरी जबाबदाऱयांमध्ये तिचं अस्तित्व जणू या ‘पाशा’च्या फासात झगडत राहतं. हाच संघर्ष तिच्या जीवनकथांना अधिक अंतर्मुख आणि संवेदनशील बनवतो.
या कथा दोन प्रवाहांत विभागल्या जाऊ शकतात – ‘पत्रास कारण की…’, ‘सुळावर चढवलेल्या सूर्याचे सत्य’, ‘व्याकुळल्या स्वप्नांची संध्याकाळ’, ‘दहशत’, ‘गॅस’ आणि ‘कुच्चीचा कायदा’ अशा घरगुती जीवनातल्या स्त्री च्या अंतसंघर्षांवर आधारित, तर ‘वशिला’, ‘दरम्यान’, ‘शोध’, ‘तपास अजून चालू आहे’, ‘योगदीक्षा’ या बाह्य जगातल्या संघर्षांवर आधारित आहेत. ‘सोपान’मधील स्त्राr आधुनिक काळाच्या ओघात स्वतला बदलताना निर्माण होणाऱया द्वंद्वात अडकलेली दिसते, तर ‘ऐसी कळवळ्याची जाती…’ घटस्फोटीत घरातील मुलीच्या लग्नाच्या प्रश्नावर नेमकं आणि मार्मिक भाष्य करते. ‘तीन पौंडांची मुलगी’ ही कथा तर या पाशात अडकलेल्या स्त्राrच्या अनास्थेचं आणि तिच्या वेदनांच्या स्वीकृतीचं हृदयस्पर्शी चित्र उभं करते.
तेजश्री प्रकाशनाचं ‘पाश’ हे शीर्षक मूळ हिंदीपेक्षा अधिक अर्थवाही ठरतं. कारण नोकरीत असो वा घरात स्त्राrचं जीवन अदृश्य बंधनांनी वेढलेलं आहे, हे या कथांतून ठळकपणे अधोरेखित होतं. काही स्त्रिया हे पाश तोडण्याची क्षमता वापरतात, तर काही त्यातच गुरफटलेल्या राहतात आणि यामुळे हा संग्रह अंतर्मुख करतो. एकीकडे आत्मभानाची ठिणगी, दुसरीकडे परंपरेचा विस्तव या दोन टोकांमधला संघर्ष या कथा अत्यंत जिवंतपणे उभा करतात.
इरा फाटक यांनी साकारलेलं मुखपृष्ठ केवळ पुस्तकाचं नव्हे, तर संपूर्ण स्त्री जगण्याचं दृश्य प्रतीक बनतं. डोळे मिटलेल्या अंतर्मुख स्त्री भोवती फिरणारं वर्तुळ दिवस-रात्र, जबाबदाऱ्या, शिक्षण, कला, पैसा यांचं प्रतीक आहे. तिच्या गळ्यातलं त्रिशूल तिच्या त्रिगुणी ऊर्जेचं, सामर्थ्याचं द्योतक आहे. वर्तुळाबाहेरील ‘पाश’ ही धवल अक्षरे काळ्या पार्श्वभूमीवर लाल सीमारेषांसह तिच्या संघर्षातून उमटलेल्या विजयाची खूण वाटतात.
एकूणच ‘पाश’ कथासंग्रह म्हणजे आधुनिक स्त्राrच्या जगण्यातील अदृश्य बंधनांचा, तिच्या अंतर्गत वेदना आणि साक्षात्काराचा आरसा आहे. जो अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो आणि शेवटी तिच्या सुप्त सामर्थ्याची जाणीवही करून देतो.
पाश
स्त्री जीवनाच्या अदृश्य बेडय़ांची कहाणी
लेखिका ः डॉ. वर्षा शिरीष फाटक
ह प्रकाशक ः तेजश्री प्रकाशन
पृष्ठे ः 286, ह मूल्य ः 300 रुपये

























































