दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, मग या टिप्स वापरून बघा, करंजी होईल खुसखुशीत

दिवाळी म्हटल्यावर विविध फराळाच्या पदार्थांची लगबग सुरु झाली असेल. पण दिवाळीतला सर्वात किचकट पदार्थ म्हणजे करंजी. अनेकदा करंजी काही ना काही कारणाने बिघडते. करंजी ही फार पूर्वीपासून आपल्या फराळाचा भाग आहे. करंजीचा घाट घालताना ती उत्तम होण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

अनेकदा करंज्या बनवताना त्या खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे करंज्या करताना अनेक गृहिणींचा उत्साह कमी होतो. करंजी खुसखुशीत बनवण्यासाठी काही टिप्सचा अवलंब करणे हे गरजेचे आहे.

करंज्या तयार करताना या टिप्स न विसरता फाॅलो करा

करंजीचे सारण हे कायम मंद आचेवर भाजावे.

करंजीचे खरे गुपित हे सारणात दडलेले असते.

तळलेली करंजी ही टिश्यू पेपरवर ठेवावी. म्हणजे तेल किंवा तूप चांगले शोषले जाते.

Sweet Dish- अवघ्या दहा मिनिटांमध्ये बनवा घरीच्या घरी साॅफ्ट गुलाबजाम

करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप किंवा तेल गरम करून घातले म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात.

करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील. गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील.

करंज्यांच्या सारणात घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होणार नाहीत.