
वाढदिवस साजरा करताना कधी-कधी मोठा केक आणला जातो. केक मोठा आणि माणसे कमी असतात. त्यामुळे बऱ्याचदा केक तसाच शिल्लक राहतो. जर केक खराब होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. केक हवाबंद डब्यात ठेवल्यास त्यात हवा आणि ओलावा जाण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे तो जास्त काळ ताजा राहतो.
केकचे थर थोडे उबदार असताना प्लॅस्टिक रॅपने गुंडाळा, त्यामुळे ओलावा टिकून राहतो. कापलेल्या कडा प्लॅस्टिक रॅपने घट्ट गुंडाळा. जर केक क्रीम फ्रॉस्टिंग, व्हीप्ड क्रीम, ताजी फळे किंवा दुधाचे पदार्थ असलेले असतील, तर ते खराब होऊ नयेत म्हणून लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज आहे.