
कपड्यावर हळदीचा डाग पडला असेल तर तो लवकर जात नाही. त्यामुळे कपडय़ावरचा हळदीचा डाग घालवायचा असेल तर काही सोप्या टिप्स या ठिकाणी देत आहोत. सर्वात आधी कापसाचा गोळा थंड दुधात बुडवा. हळदीचा डाग असलेल्या ठिकाणी हलक्या हाताने लावा. यामुळे हळदीचा रंग आरामात जाऊ शकतो.
डागाच्या ठिकाणी व्हिनेगर भिजवा. 15 ते 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने घासल्यास डाग निघून जाईल. डिशवॉशिंग लिक्विडचाही वापर करा. डाग ताजे असताना ते काढणे सोपे जाते. त्यामुळे कपड्यावर डाग पडल्यास त्यावर त्वरित उपाय करा. उन्हातील सूर्यप्रकाश हळदीचा पिवळा रंग तोडण्यास मदत करते.