
गोरा आणि चकचकीत चेहरा दिसावा असे प्रत्येकाला वाटते. यासाठी काही घरगुती उपाय आहेत. दह्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून रोज चेहऱ्याला लावल्याने त्वचेला चमक येते. काकडीचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळून दररोज 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. बेसन आणि दह्याचे मिश्रण त्वचेला एक्सपहलिएट करते व डाग कमी करते.
गव्हाचे पीठ, हळद, मध आणि गुलाबपाणी हे नैसर्गिक घटक एकत्र करून एक फेसपॅक तयार करा. हा पॅक त्वचेला ओलावा आणि चमक देतो. गरम दुधात थोडे केसर घालून काही तास ठेवा आणि नंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. पपईमध्ये नैसर्गिक एन्झाईम असतात, पपई आणि दह्याचे मिश्रण वापरू शकता.
 
             
		




































 
     
    





















