
■बाजारातून दही आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच घट्ट आणि नैसर्गिक पद्धतीने दही तयार करू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. याचा वापर करून दही घरच्या घरी बनवता येते. घरीच दही बनवण्यासाठी सर्वात आधी दूध एका भांडय़ात 15 मिनिटांपर्यंत उकळू द्या. दूध कोमट करा. म्हणजे गरम किंवा थंड नसावे.
■कोमट दुधात एक चमचा विरजण म्हणजेच आंबट दही त्यात मिसळा. मिश्रण हलक्या हाताने ढवळा. हे गरम ठिकाणी ठेवा. याला 6 ते 8 तासांपर्यंत तसेच ठेवा. दही सेट झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे दही आणखी घट्ट होईल. तसेच जास्त आंबट होणार नाही. दूध जास्त वेळ उकळल्याने घट्ट दही तयार होते.

























































