
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने 11 लाख रुपये मदतीचा धनादेश शनिवारी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, मुख्यकार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, संचालक सुशिल डक यांनी उपविभागीय दंडाधिकारी शोभा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहकारी संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बन या संस्थेने 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे.

































































