
अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला काही दिवसांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्या हाताला बॅण्डेज पट्टी लावण्यात आली होती. या बॅण्डेज पट्टीने तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
छोटय़ा पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी मेकअप रूममध्ये गळफास घेतला. वयाच्या 20व्या वर्षी तुनिषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली. आत्महत्येनंतर पोलिसांनी तुनिषाचा कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, मध्यरात्री जे.जे. रुग्णालयात तुनिषाचे शवविच्छेदन करण्यात आले. तुनिषा गर्भवती असल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसून तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम आढळलेली नाही. शिझान आणि तुनिषा यांचे मोबाईल पह्न जप्त करण्यात आले असून आत्महत्ये प्रकरणी अद्यापि अतिरिक्त प्रेमसंबंध, ब्लॅकमेलिंग, लव्ह जिहाद असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही, असे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.




























































