खड्डा चुकविताना दुचाकी; ट्रकचा अपघात, बहीण-भावाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जिंतूर

रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात मोटारसायकल स्लिप होऊन बहीण-भाऊ ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परभणी रस्त्यावर आज सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

जिंतूर तालुक्यातील कोरवाडी येथील लक्ष्मण सुदाम खरात (१८, रा. कोरवाडी) हा आपली मावस बहीण मनीषा रामप्रसाद पाचंगे (२४, रा. पिपळगाव गायके) हिला माहेरी सोडण्यासाठी मोटारसायकलवरून (क्र. एम.एच. ३८ एल. २०६) पिंपळगाव गायके येथे जात असताना जिंतूर शहरालगत ग्रीन पार्कजवळ मागून येणाऱ्या ट्रकला (एम.एच. १८ बी. ए. ०५०६) ओव्हरटेक करताना मोटारसायकल स्लिप झाली. यामध्ये दोघे ही टायरखाली येऊन त्यांचा चेदामेदा झाला. तीन तासांनी मृतांची ओळख पटली.