
ट्विटरचा डेटा लीक झाला. झाल्यानंतर तातडीने अपडेट करण्याच्या सूचना अँड्रॉइड युजर्सना देण्यात आल्या. ट्विटर ऍपमध्ये मॅलिशिअस कोड इंजेक्ट करण्यात आले होते, त्याद्वारे युजर्सची वैयक्तिक माहिती मिळवता येणेही शक्य होते. गेल्या शुक्रवारी याचा परिणाम हिंदुस्थानसह जगभरातील ट्विटर युजर्सच्या अकाउंटवर दिसून आला होता’, हे मान्य करत ट्विटरने आपल्या युजर्सना तातडीने अँड्रॉइड ऍप अपडेट करण्याची सूचना केली आहे. ऍपमधील त्रुटी दूर करण्यात आली आहे. तसेच युजर्सना इमेलद्वारे नोटिफिकेशन्स देऊन त्यांना ऍप अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती ट्विटरने दिली. मात्र, याचा किती युजर्सना फटका बसलाय, याची माहिती दिलेली नाही. याशिवाय iOS वेब युजर्सना याचा फटका बसलेला नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. डेटा चोरीचे काही पुरावे मिळालेत की नाही याबाबत अद्याप कंपनीने काही सांगितलेले नाही.

























































