ट्विटरचे लाइट अॅप, स्लो नेटवर्कमध्येही करा ट्विट

63

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ट्विटरचे लाइट अॅप आता हिंदुस्थानातील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. या अॅपमुळे स्लो नेटवर्क असतानाही युजर्सना ट्विटर हॅण्डल करता येणार आहे.

ट्विटरने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या अॅपची आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली होती. हे अॅप आता हिंदुस्थानी युजर्ससाठी आणण्यात आले आहे. सर्वात आधी अॅण्ड्राईड युजर्ससाठी हे अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हिंदुस्थानात इंटरनेटला पुरेशी गती मिळत नसल्याने युजर्सना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन फेसबुकसह स्काईप, लिंक्ड इन, फेसबुक मॅसेंजर आदींनीही लाईट अॅपच्या आवृत्या सादर केल्या आहेत. आता यात ट्विटरचीही भर पडली आहे. हे अॅप अतिशय संथगतीचे नेटवर्क असतानाही अतिशय वेगात काम करीत असून यासाठी फक्त एक मेगाबाईटचा डाटा खर्च होणार आहे.

15 ऑगस्टनिमित्त खास लाल किल्ल्याची ईमोजी

15 ऑगस्टनिमित्त ट्विटरने खास लाल किल्ल्याची ईमोजी तयार केली आहे. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिंिमगदेखील या मायक्रो ब्लॉगींग साईटवरून केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या