
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
विशेष न्यायालयाने 2002 मधल्या गोध्रा ट्रेन जळीतकांडप्रकरणी आणखी दोनजणांना दोषी ठरवले आहे, तर तीनजणांची मुक्तता केली आहे. दोषी आढळलेल्या दोघांना जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2002मध्ये कारसेवक प्रवास करीत असलेल्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती. त्यावेळी 59 कारसेवक ठार झाले होते.
त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीचे व्रण अद्यापही ओले आहेत. 2015-16 मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी पाचजणांना गोध्रा जळीतकांडप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयासमोर त्याची सुनावणी झाली आणि तीनजणांची मुक्तता करण्यात आली, तर दोघांना दोषी धरण्यात आले. फारुख भना व इम्रान ऊर्फ शेरू बाटिक अशी दोषी गुन्हेगारांची नावे आहेत, तर हुसेन सुलेमान मोहम, कासम भामेदी व फाऊख धांतिया अशी मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
summary-two accused got life imprisonment in godhra case
























































