हंबीरवर हल्ला करणाऱ्या मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ससून रूग्णालयात उपचार घेणाऱ्या मोक्कातील आरोपी तुषार हंबीर याच्यावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सुत्रधारासह दोघांना युनीट पाचने उत्तमनगर परिसरातून अटक केली.

मुख्य सुत्रधार प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर वय 26 रा. भिमनगर, उत्तमनगर आणि परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार वय 21 रा. ऊरळी-देवाची अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार नामदेवराव हंबीर (वय – 35 रा. गोंधळेनगर, हडपसर) याच्यावर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न करण्यात आला होता.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात हिंदुराष्ट्र सेनेचा तुषार हंबीर मोक्कानुसार कारावाई केली होती. त्याला चालता येत नसल्यामुळे 25 ऑगस्टला हंबीरला येरवडा कारागृहातून ससून रूग्णालयात दाखल केले होते. 5 सप्टेंबरला टोळक्याने रूग्णालयात शिरून त्याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मुख्य हल्लेखोर उत्तमनगर परिसरात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने प्रकाश दिवाकर आणि परवेज इनामदार यांना अटक केली. यापुर्वी पथकाने प्रतीक वाघमारे आणि ऋतिक गायकवाड यांनाही अटक केली होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय कृष्णा बाबर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, दयाराम शेगर यांनी केली.

कोट- ससून रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सुत्रधारासह त्याच्या साथीदाराला उत्तमनगर परिसरातून ताब्यात घेत अटक केली. यापुर्वीही पथकाने दोन जणांना कॅम्प परिसरातून अटक केली होती. – हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, युनीट पाच