
बंदुकीचा धाक दाखवून चेन स्नॅचिंग करणाऱया दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, चार जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने असा सात लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे नऊ व फौजदार चाकडी पोलीस ठाण्याचे दोन असे 11 गुन्हे उघडकीस आणले.
अनिल शंकर नलवडे (वय 28, रा. पोतेकरवस्ती, गोतोंडी, ता. इंदापूर, पुणे; सध्या कविटगाव, ता. करमाळा) व राजेंद्र दिनकर बागडे (वय 26, रा. पोतेकरवस्ती, गोतोंडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 फेब्रुकारी रोजी दोन नातींना घेऊन घराकडे जाणाऱया आजीला रस्त्यात अडकून दुचाकीकरून आलेल्या दोघांनी त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखकून सोन्याचे दागिने लंपास केले होते. अशा घटना वारंवार होत असल्याने पोलीस आयुक्त हरीश बैजल, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन फौजदार संदीप शिंदे व त्यांच्या पथकने चेन स्नॅचिंगकिरोधात मोहीम तीक्र केली.
चोरीचे सोने विकण्यासाठी दोनेजण पूना नाका येथून सोलापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जुना पूना नाका येथील पुलावर सापळा लावला. स्पीडब्रेकरजवळ दुचाकीचा केग कमी झाल्यावर पोलिसांनी दोघांना पकडले. दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक देशी पिस्तूल, चार जिकंत काडतुसे व सोन्याचे दागिने आढळून आले. एकूण सात लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनी 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.
शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, फौजदार संदीप शिंदे, पोलीस नाईक शंकर मुळे, संदीप जाकळे, संतोष येळे, कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, अभिजित धायगुडे, उमेश साकंत, राजू मुदगल, चालक सतीश काटे यांनी ही कारवाई केली.



























































