अरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

sunk_drawn_death_dead_pic

सामना प्रतिनिधी, नगर

नगर तालुक्यातील अरणगाव येथे जांभळं खाण्यासाठी गेलेल्या काका-पुण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य मोरे व अनुज मोरे असे त्यांची नावे आहेत. या प्रकाराला संदर्भामध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी हे घटनास्थळी गेले आहे.

अरणगांव मधील मोरे वस्ती येथील आदित्य मारूती मोरे (वय 10 वर्ष), अनुज दत्तात्रेय मोरे (वय 13 वर्ष) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, सुट्टी असल्यामुळे मोरे परिवारातील तिघे जण जांभळं खाण्यासाठी गेले होते. त्यांची पाण्याची बाटली शेजारीच असलेल्या शेततळ्यात पडली. बाटली काढण्यासाठी आदित्य व अनुज शेततळ्यात उतरले. पाणी जास्त होते. त्यांच्यासोबत असणारा तिसरा सात वर्षाचा मुलगा घाबरल्याने तो घरी पळून घरी गेला. त्याने काही वेळ कोणालाच काही सांगितले नाही. परंतु काही वेळाने कुटुंबीयांनी शोधाशोध केल्याने आणि छोट्या मुलाला विचारले असता, तो छोटा मुलगा घरच्यांना घेऊन शेततळ्यावर गेला. तोपर्यंत शेततळ्यात पडलेल्या दोन मुलांचा मृत्यू झालेला होता. ग्रामस्थांनी त्यांना शेततळ्यातून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात हलविले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेमुळे अरणगावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या घटनेची माहिती घेतली आहे सायंकाळी उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे