शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू: जालना जिल्ह्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी शिवारात ही घटना घडली.

गौरव वाघमारे आणि आकाश वाघमारे अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही १७ ते १८ वर्ष वयोगटातील आहेत. गौरव आणि आकाश दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले होते. गौरवला पोहता येत नसल्याने त्याने आरडा-ओरड केली. त्यानंतर आकाशने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आकाशने गौरवला वाचवण्यासाठी शेततळ्यात बांधलेल्या ठिंबकच्या नळीला पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांच्या वजनाने ही नळी तुटल्याने दोघेही
शेततळ्यात बुडाले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे चांधई ठोंबरी गावावर शोककळा पसरली आहे.