बीडमध्ये दोन रूग्णांची कोरोनावर मात, बँड वाजवून दिला डिस्चार्ज

468

मुंबईहून बीडमध्ये दाखल झालेल्या दोघा जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयमध्ये उपचार सुरू होते. दोन्ही तरुण आज कोरोनातून बरे झाले असून त्यांना बँड वाजवून आणि टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांच्यासह उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका उपस्थित होत्या.

बीडमध्ये दाखल झालेल्या गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील दोघा जणांना कोरोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. यात एक 12 वर्षीय मुलीचा आणि 29 वर्षीय तरूणाचा समावेश होता. गेल्या दहा दिवसांपासून ते बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये उपचार घेत होते. अत्यंत खबरदारीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  आज त्या दोन्ही रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर यशस्वी मात करणार्‍या या दोन रूग्णांना निरोप देताना आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिकाही भावूक झाल्या. योगायोगाने कोरोनामुक्त झालेल्या बारा वर्षीय मुलीचा आज वाढदिवस होत्या. रूग्णालयाबाहेर केक कापून तिचा वाढदिवस साजरा करून तिला निरोप दिला गेला.

आपली प्रतिक्रिया द्या