
हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाला आणि सीआरपीएफ जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासाठी त्यांची स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवली होती. त्याचे आज अहवाल आले आहेत.
हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलातील मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्ताला गेलेल्या एसआरपीएफ जवनांपैकी आतापर्यंत 12 जण कोरोना पॉजीटीव्ह आढळले आहेत. तर जालना येथून हिंगोली तालुक्यात गावी आलेल्या एका जवानाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
जालना येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या चार वर्षीय पुतण्याला देखील कोरोनाने ग्रासले आहे. तर आज बुधवारी सकाळी हिंगोली जिल्ह्याच्या चिंतेत भर घालणारा अहवाल आला आहे. सोलापुर जिल्ह्याच्या बार्शी येथुन 21 वर्षीय तरुण 25 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आला होता. या तरुणाला वसमतच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच मुंबई येथून आलेल्या एका एसआरपी जवानाला देखील कोरोना झाला आहे.



























































