दोन बडे बुकी पुणे पोलिसांच्या ताब्यात, 1 कोटी जप्त; IPL सामन्यावर लावला होता सट्टा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय बुकींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतडा आणि देहूरोडकर मोठे बुकी आहेत. आयपीएल सामन्यांवर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाहुन पोलिसांनी रोकड आणि इतर साहित्य जप्त केले आहे.