पाली-भुतीवली धरणात विक्राळीचे दोन तरुण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशन जवळ असलेल्या पाली-भुतिवली धरणामध्ये मुंबईतील विक्रोळी येथील दोन तरुण बुडाले आहेत. नेरळ पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खोपोली,पनवेल येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. सोफाअली मुस्ताकअली नाईक ( २२) आणि आमनअली अशिकअली शेख (१७) अशी मृतांची नावे आहेत.

pali-dam-24

कर्जत तालुक्यातील पाली -भूतींवली येथे लघु पाटबंधारे विभागाचे एक धरण आहे. सिंचनासाठी पाणी देण्यासाठी बांधलेल्या या धरणाचे पाणी गेली अनेक वर्षे वापराविना पडून आहे. या धरणात पोहण्यासाठी बंदी असताना अनेक हौशी तरुण पोहायला येत असतात. रविवार २९ जुलै रोजी विक्रोळी मुंबई येथील कुटुंब वर्षासहलीसाठी या पाली भूतीवली धरणाजवळ आले होते. त्यातील २ तरुण दुपारी ३ च्या सुमारास पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन्ही तरुण धरणात बुडाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शेडगे, रतीलाल तडवी, तसेच अनेक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

summery…two people drawn in pali bhutwali dam