2 जुलै रोजीच्या दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द, नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथून सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि सोमवारी मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे बऱ्याच गाड्यांवर परिणाम झाला होता. यामुळेच मंगळवार दिनांक 2 जुलै 2019 रोजी सुटणाऱ्या गाडी संख्या 17617-17618 मुंबई-नांदेड-मुंबई तपोवन एक्क्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच 1 जुलै रोजी सुटलेली गाडी संख्या 11402 नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावेल आणि दिनांक 2 जुलै रोजी सुटणारी गाडी संख्या 11401 मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथूनच सुटेल. प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे रेल्वे विभागाने कळवले आहे.