रिक्षाचालकांच्या दोन गटात हाणामारी,भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची भोसकून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाडे घेण्याच्या वादातून रिक्षाचालकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घणसोली रेल्वे स्थानक परिसरात आज घडली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणांवर रिक्षाचालकांच्या एका गटाने तीक्ष्ण हत्याराने वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.

घणसोली स्टेशनबाहेर डी मार्ग परिसरात शेअर ऑटो रिक्षा एका ठिकाणी थांबतात. आज दुपारी तीनच्या सुमारास भाडे घेण्यावरून स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुभाष जाधव आणि सत्या उर्फ सतीश यांचा आदिल शेख आणि राजेंद्र वाशीवाले या दोघांबरोबर वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार हाणामारी सुरू झाली. आदिल शेख याने आपला भाऊ आयान शेख याला बोलावून घेतले. आयान भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करीत असताना रिक्षाचालकांच्या एका गटाने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. या हल्ल्यात आयान ठार झाला, तर आदिल आणि राजेंद्र गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील आणि प्रमोद यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू