
सामना ऑनलाईन । अनंतपूर
आंध्रप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांना खायला अन्न नाही मिळाले म्हणून त्यांनी माती खाली. त्यानंतर त्या दोघांचा मृत्यू झाला. दोघांचे वय 3 असून एकाचे नाव संतोष तर दुसरीचे नाव वेन्नेला होते. त्यांचे आईवडील मोलमजूरी करतात.
मिळालेल्या माहितीनुसार वेन्नेला आपली मावशी नागमणी यांच्या घरी राहत. जेवण न मिळाल्याने दोघांना माती खाण्याची सवय लागली होती. संतोषचा मृत्यू 6 महिन्यांपूर्वीच झाला होता. तर त्याची बहीण वेन्नेलाचा मृत्यू 28 एप्रिल रोजी झाला. शेजारच्यांनी सांगितले की दोघांचा मृत्यू उपाशी पोटी माती खाल्याने झाला आहे.
जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, “दोघांचे आई वडिल कामाच्या शोधार्थ बाहेर निघायचे. तेव्हा या दोघांना आजीकडे ठेवायचे. आजी त्यांची योग्य देखभाल करत नव्हती. मुलांचे शवविच्छेदन केले नाही.” परंतु दोघांचा मृत्यू भुकेने आणि कुपोषणानेच झाल्याचे त्यांनी सांगितले.
आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, हे कुटुंब खूप गरीब होते. त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नव्हते. त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने प्रशासनाने त्यांना राशन कार्डही दिले नव्हते.



























































