
‘मोमो’ हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या मोमोजची चव चाखायला मिळते. सध्या नेटिझन्समध्ये हा पदार्थ एका वेगळ्याच चर्चेत आला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये चक्क दोन किलो वजनाचा बाहुबली गोल्ड मोमो मिळतोय.
एका फूड ब्लॉगरने सोशल मीडियावर या बाहुबली मोमोचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो झपाटय़ाने व्हायरल झाला आहे. या मोमोसोबत ऑरेंज मिंट मोजिटो, दोन चॉकलेट मोमो, तीन प्रकारच्या चटणी आणि सॉस दिले जातात. अनेकांनी एकदा तरी या बाहुबली मोमोची चव चाखण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या गोल्ड मोमोची किंमत 1299 रुपये इतकी आहे. काही दिवसांपूर्वी दुबईतील गोल्ड वडापावचीदेखील अशाच प्रकारे चर्चा रंगली होती.




























































