दोन लाख दुकानांवर झळकल्या मराठी पाटय़ा, मुंबईभरात पालिकेची झाडाझडती सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईभरात आतापर्यंत दोन लाख दुकानदारांनी दुकानावरील पाटय़ा मराठीत करून दुकानाच्या दर्शनी भागात लावल्या आहेत. दुकानावरील पाटय़ा मराठीत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अखेरची मुदत असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालिकेने दिले आहेत. अन्यथा कारवाई होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिकेशनात मार्च 2022 ला दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंका दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांकर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते, मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी पाटय़ांच्या अंमलबजावणीसाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु व्यापारी संघटनांच्या मुदतवाढीच्या मागणीनुसार आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत पालिकेने केलेल्या तपासणीत पाच लाख दुकानांपैकी सुमारे दोन लाख म्हणजे 40 टक्के दुकानांनी मराठी पाटय़ांची अंमलबजाकणी केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के पाटय़ांची अंमलबजावणी न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. पाटय़ा मराठी करण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अजूनही तीन लाख जणांनी अंमलबजावणी केलेली नाही.

असा आहे नियम
z महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्कये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.