पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

353

कश्मीरच्या दक्षिण दिशेला असलेल्या पुलवामा जिल्ह्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.

एऩडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, याआधी कठुआ इथून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची कसून तपासणी केल्यानंतर या दोन दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गेल्या गुरुवारी हे तिघेही पंजाबहून कश्मीरच्या दिशेने येत होते. त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे एके श्रेणीतल्या काही रायफल्सही सापडल्या होत्या. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्या तपासणीवेळी त्यांनी अजून दोन जणांची नावं उघड केली होती.

त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली. सुहेल अहमद लाटू आणि बशीर अहमद लोन अशी या दोघांची नावं आहेत. यातील एक जण या ट्रकचा मालक आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या