जवानांवर तरुणांची दगडफेक;कश्मीरात बडगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, जम्मू

जम्मू-कश्मीरात बडगाम जिल्हय़ात झिनपंचालमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा आज चकमकीत खात्मा केला. मात्र यामुळे फुटीरतावादी तरुण खवळले. या तरुणांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत सुरक्षा दलाच्या जवानांवरच दगडफेक केली. यावेळी हिंसक जमावाला पांगविण्यासाठी जवानांनी सौम्य लाठीमार केला.

53 राष्ट्रीय रायफल्स, बडगाम पोलीस सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांवर ही कारवाई केली. या चकमकीनंतर बडगामच्या छादुरा भाग आणि छादी शरीफमध्ये मोठा तणावर पसरला. जवान आणि तरुणांमध्ये झटापट झाली. काही निदर्शकांनी जवानांवर दगडफेक केली. मात्र जवानांनी परिस्थिती कौशल्याने हाताळून हिंसक जमावाला सौम्य लाठीमार करून घटनास्थळावरून पिटाळून लावले. झिनपंचालमध्ये आणखी एक दहशतवादी असल्याचा संशय असल्याने उशिरापर्यंत या भागात जवानांची ऑपरेशन ऑल आऊट मोहीम सुरू होती.