नागपूर – पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू

437

कन्हान येथे पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवेश प्रवीण नागदेवे (14) आणि अजेश अतुल नितनवरे (13) अशी मृतांची नावे आहेत. प्रवेश आणि अजेश हे दोघेही इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होते. दोघेही हरदास नगर येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीची शाळेला सुट्टी असल्याने दोन्ही मुलं मित्रासोबत नदीमध्ये पोहायला गेली होती. सर्व मुलं जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कन्हान नदी, महादेव घाट येथे पोचण्यास गेले होते. या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवेश आणि अजेश दोघे बुडाले. पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आलेल्या मित्रांनी याची माहिती दोघांची घरी दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि जुनी कामठी पोलिसांनी गोताखोरांसह घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. गोताखोरांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या