दोन मोटार सायकलची टक्कर, तीन जखमी

302
accident

वाढवणा पासुन जवळच असलेल्या उमरगा पाटीजवळ 9 ऑक्टोबर बुधवार रोजी 4 वाजता दोन मोटारसायकलची जोरदार टक्कर झाली. यात तिघे जण जखमी झाले आहेत. किरण विठ्ठल बिरादार, धनाजी थोराजी पाटील, गणेश अण्णाराव सुर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चालक महेबुब शेख यांनी तिघा जखमींना अॅम्बुलन्समधून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण व धनाजी हे दोघे एकाच मोटारसायकलवरुन वाढवणा पाटी कडे येत होते. त्याचवेळी समोरून उदगीरला जाण्यासाठी गणेश अण्णाराव सुर्यवंशी निघाले होते. अचानक दोघा मोटारसायकलींची टक्कर झाली.

आपली प्रतिक्रिया द्या