शिखर सर केल्यानंतर दोघा गिर्यारोहकांचा मृत्यू, दोन बेपत्ता

सामना ऑनलाईन । काठमांडू

एव्हरेंस्ट आणि मकालू ही हिमशिखरे सर केल्यानंतर आणखी दोघा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. लष्कराचे जवान रवी ठाकूर (28) यांचा एव्हरेंस्ट सर करून बेस कॅम्प-4 मध्ये परतल्यानंतर मृत्यू झाला तर नारायण सिंह यांनी मकालू हिमशिखर सर केले होते. ते बेस कॅम्प-4मध्ये परतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला तर दिनकर घोष (52) हा गिर्यारोहक बेपत्ता आहे. दिनकर हे मकालू शिखर सर करून परतत असताना ते बेपत्ता झाले. घोष यांनी या आधी एव्हरेस्टसह अनेक महत्त्वाची हिमशिखरे सर केली आहेत. आर्यंलंडचा सीमस सीन लॉलेस हा गिर्यारोहकही बेपत्ता झाला आहे. गुरुवारी विप्लव वैद्य आणि कुंतल करार या दोघा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.