
आयपीएलचा उर्वरीत मोसम सध्या यूएईत पार पडतोय. याचप्रसंगी बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या मोसमाची तयारीही सुरू केली आहे. पुढच्या वर्षापासून अर्थातच 2022 सालापासून आयपीएलमध्ये आठऐवजी दहा संघांचा समावेश असणार आहे. या दोन नव्या संघांची घोषणा 25 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
बीसीसीआयकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आयपीएलच्या 2023 ते 2027 या कालावधीसाठी मीडिया राईट टेंडर प्रकियेलाही सुरुवात करण्यात येणार आहे. आयपीएलच्या दोन नव्या संघांची घोषणा झाल्यानंतर या प्रकियेचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.




























































