पहिल्याच पावसाने राष्ट्रीय महामार्गाची दाणादाण! दोन पूल वाहून गेले, वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, केज

मेहकर पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा तकलादूपणा समोर आला आहे. केज कळंब रस्त्यावरील साळेगाव दरम्यानचे दोन पर्यायी पूल रात्रीच्या पावसात वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या प्रकाराने महामार्गाच्या कामातील बोगसपणा उघडकीस आला आहे.

मेहकर ते पंढरपूर जाणाऱ्या रस्त्यावर केज तालुक्यातील साळेगाव येथील पर्यायी दोन पूल पहिल्याच पावसाने वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या हे काम हैदराबादची मेघा इंजिनिअरिंग कंपनी करत आहे. कामातील बोगसपणा उघड झाला असून कामात विलंब होत आहे. हा मार्ग सध्या बंदच आहे. आता कळंबकडे जाण्यासाठी जुन्या केज शहरातून बोबडेवाडी मार्गे गोटेगाव सुकली मालेगावहून कळंबला जावे लागेल. पर्यायी पूल तत्काळ दुरूस्त करून वाहतूक सुरू करण्याची मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.