परभणीत वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू, शेतकर्‍याचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीत जिल्ह्यातील जिंतुरमध्ये वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. यात शेतकर्‍याचे चांगलेच नुकसान झाले आहे.

जिंतुर तालुक्यातील  चारठाणा या गावापासुन 12 कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे वाघी (धानोरा)येथील शामराव  रावसाहेब खंदारे याच्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली चार बैल बांधलेले होते. गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह वीजा कडाडल्या. तेव्हा लिबांच्या झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर वीज कोसळली. त्यात दोन्ही बैलांच्चा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रशासनाने पंचनामा केला आहे.