भूजमध्ये दोन पाकिस्तानी बोटी जप्त

509

गुजरात राज्यातील पाकिस्तान सिमेवर गस्तीवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका नाल्यातून दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या आहेत. दोन महिन्यापूर्वीही अशीच एक बोट बीएसएफ जवानांनी पकडली होती. जप्त केलेल्या या बोटी मासेमारीच्या असून त्या सोडून देण्यात आलेल्या होत्या, असे नंतर आढळून आले आहे.

सिंगल इंजिन असलेल्या या बोटी सापडल्यानंतर या भागात बीएसएफने मोठय़ा प्रमाणात शोधमोहीम सुरू केली. परंतु काहीही संशयास्पद सापडलेले नव्हते. तथापि शोधमोहीम अद्यापही सुरूच आहे. दोन महिन्यांपूर्वीही याच भागात अशीच एक मच्छीमार बोट बीएसएफ जवानांनी पकडली होती. परंतु, बोटीवरील मच्छीमार पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या