तिरूपतीला दर्शनासाठी गेलेले अमरावतीचे 2 तरूण चेन्नईच्या समुद्रात बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीहून तिरूपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या चार तरूणांपैकी दोन तरूण चेन्नईच्या समुद्रात बुडाले. सुमित व आनंद अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहे, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोलापूरी गेट व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुमित होम, आनंद पाचंडे, आदित्य व चेतन हे चार मित्र तिरूपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. 22 डिसेंबरला चौघेही चेन्नईच्या समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. यापैकी आदित्य व चेतन बाहेर आले. मात्र इतर दोघे मात्र बुडाले.

आपले मित्र समुद्रात बुडाल्याचे इतर दोघांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती चेन्नई पोलिसांना दिली. समुद्रात बुडालेल्या सुमित व आनंदच्या नातेवाईकांना चेन्नई पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांचेही नातेवाईक सोमवारी सकाळी रवाना झाले आहे.